Kavyashilp Digital

Hosting | Domain | Web Design

Booking Now

वेबसाईट उद्देश –

तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट तयार करुन घेऊ शकता. तुमची साधी माहिती देणारी अव्यावसायिक वेबसाईट असेल तर तुमची माहिती रोचक व खिळवणारी आहे का हा विचार करा. जर ती एखाद्या सेवेला किंवा उत्पादनाला प्रसिद्धी देणार असेल तर इतरांपेक्षा काय वेगळी कल्पना लढवता येईल याचा विचार करा.

डोमेन

डोमेन नावाशिवाय आपल्याकडे वेबसाइट असू शकत नाही. जसा रस्त्याचा पत्ता आपण कुठे राहता हे लोकांना सांगतो तसेच डोमेनमुळे ग्राहक थेट आपल्या वेबसाइटवर जाउन पोचतात. शक्यतो .com हे व्यवसायाला उत्तम पण .in,.co.in,.org,.net ह्या एक्सटेंशन ने सुद्धा डोमेन बुक करा. आकर्षक नावं डोमेन म्हणून बुक करणे व नंतर ती त्या नावांच्या व्यवसायांना चढ्या भावाने विकणे हा एक व्यवसाय आहे जो अधिकृत आहे. त्या मुळे जर तुमच्या आवडीचे डोमेन उपलब्ध असेल तर लगेच बुक करा.

होस्टिंग

होस्टिंगमुळे तुमची साइट वेबवर दिसते. होस्टिंग मध्ये विंडोज व लिनक्स असे दोन प्रमुख प्रकार येतात. विंडोज होस्टिंग थोडे महाग पडते पण सुरक्षेबाबत जरा चांगले असते. लिनक्स होस्टिंग जरा स्वस्त पडते, सुरक्षा आपल्याला हव्या त्या पद्धतीने व स्तरावर लावता येते. लिनक्स होस्टिंग त्याच्या लवचिकतेमुळे लोकप्रिय आहे. होस्टिंगची जागा ही mb अथवा gb मधे मोजतात. जितकी जागा जास्त तितके त्याप्रमाणात पॅकेज स्वस्त होत जाते.

वेबतंत्रज्ञाचा सल्ला 

तुम्हाला योग्य वाटणार्‍या वेबतंत्रज्ञाला काम देऊन वेबसाईट तयार करा. डोमेनबरोबरच होस्टिंग घेण्याची घाई करु नका, वेबतंत्रज्ञाच्या सल्ल्यानेच ती विकत घ्या व त्याच्याकडून डोमेन संलग्न करा. अनेक तांत्रिक कारणांमुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. वार्षिक डोमेन, होस्टिंग, इमेल सेवा व व्यवस्थापन याचा किती खर्च येतो हे पहाव. वेबतंत्रज्ञाचे कौशल्य, वेळ, तंत्रज्ञान व त्यातून मिळणार्‍या सेवा यांची माहिती घ्या.  
Call for Website
× Inquiry